मुंबई

मुंबईत कोरोनाचा कहर थांबेना; बाधितांच्या संख्येचा गुणाकार सुरूच...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : मुंबईत कोविड 19 चा गुणाकार सुरूच असून बाधित रुग्णांच्या संख्येत आज ही मोठी वाढ झाल्याचे दिसते. आज ही तब्बल 357 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोविड बाधितांचा आकडा 4589 येऊन पोहोचला आहे. तर आज 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत रुग्णासंख्या काहीशी घटली असली तरी मृतांचा आकडा थोडा वाढला आहे.

आज मुंबईत 357 नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 4589 झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आज 189 रुग्ण आढळले असून 168  रुग्ण 21 ते 22 एप्रिल दरम्यान दाखल झाले असल्याचे सांगण्यात येते. आज झालेल्या 11 मृत्यूंपैकी 7 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 7 पुरुष तर 4 महिलांचा समावेश होता. मृतांचा एकूण आकडा 179 झाला आहे. आज एकूण 359 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 7606 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या 184 विशेष क्लिनिक मध्ये 7203 लाभार्थीचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी 2494 संशयितांचे नमुने घेण्यात आले. पलिकेतर्फे आजपर्यंत 53386 पेक्षा अधिक इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT