मुंबई

नवी मुंबईतील कचरावेचक महिलांना कर्करोगाने ग्रासले!

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे नुकत्याच झालेल्या आरोग्य शिबिरात स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईत सुमारे ७०० कचरावेचक महिला आहेत. त्यांना स्त्री-मुक्ती संघटनेंतर्गत एकत्र करण्यात आले आहे. त्यानुसार २०० पेक्षा अधिक महिलांना नवी मुंबई पालिकेतर्फे ओळखपत्र देण्यात आले आहे. या महिलांसाठी स्त्री-मुक्ती संघटनेने टाटा संस्थेमार्फत नुकतेच आरोग्य शिबिर घेतले होते. यामध्ये ४० जणींची तपासणी करण्यात आली. त्यात ५ जणींना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या समस्या, दमा व त्वचारोगांनाही सामोरे जावे लागत आहे, असेही स्पष्ट झाले आहे.

स्त्री-मुक्ती संघटनेच्या नवी मुंबई विभाग अध्यक्षा वृषाली मगदूम यांनी सांगितले, की कचरा विकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दररोज ७ ते ८ तास त्या धूळ, दुर्गंधीमध्ये काम करतात. त्यांचे शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

परिसर सखी विकास मंचच्या समन्वयक रुक्‍मिणी पॉल म्हणाल्या, कचरावेचक महिलांसोबत त्यांची लहान मुलेही असतात. ती तेथेच कचऱ्यात खेळत बसलेली असतात किंवा त्यांची मोठी भावंडं त्यांना सांभाळतात. त्यांच्या मुलांमध्येही आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता मोबाईल क्रश सुरू करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधांबद्दल या महिलांमध्ये सातत्याने जनजागृती होणे गरजेचे आहे. 

कचरावेचक महिलांना पालिकेतर्फे गणवेश, हातमोजे देण्यात येतात. परंतु त्याच्यामुळे कचरा पटापट वेगळा करता येत नाही. त्यामुळे त्या हातमोजे घालणे टाळतात. दवाखान्यात जाणे टाळत असल्याने त्यांना आजारांबद्दलही माहिती नसते. 
- वृषाली मगदूम, स्त्री-मुक्ती संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT