new option for travelers from BEST online recharge  Best Chalo App or Best Chalo Smartcard mumbai
new option for travelers from BEST online recharge Best Chalo App or Best Chalo Smartcard mumbai sakal
मुंबई

BEST Bus : रांगेत थांबू नका, पुढे चला; बेस्टकडून प्रवाशांना नवा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मोठ्या रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत यापुढच्या काळात डिजिटल पर्यायांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बस प्रवेशासाठी प्राधान्य मिळणार आहे. या नव्या पर्यायामुळे बस प्रवाशांमध्ये खटके उडचण्याची चिन्हे आहेत.

बेस्टच्या डबल डेकर बसच्या निमित्ताने या मॉडेलला सुरूवात होण्याचे संकेत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे डिजिटल आणि चलो एपचा वापर करणाऱ्यांना यापुढच्या काळात प्रवासासाठीचा प्राधान्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो एप आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पध्दतीने तिकिट काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता प्रवाशाना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ‘बेस्ट चलो एप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’द्वारे प्रवासभाडे अदा करावयाचे आहे. डिजिटल पध्दतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्टया पैशांची अडचण निर्माण होणार नाही.

डिजिटल पध्दतीचा प्रसार आणि वापर मोठया प्रमाणावर होण्याकरीता उपक्रमाच्यावतीने उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांकरीता मार्च महिन्यापासून काही अतिरिक्त सुविधा देण्यात येणार आहेत.

याअंतर्गत ‘बेस्ट चलो एप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणा-या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. विशेषतः सुरुवातीच्या बसथांब्यांवर अशा प्रवाशांना सर्वप्रथम प्रवेशाची सुविधा राहील.

OnLine Re-charge च्या सुविधेबरोबरच बसगाडीतील बसवाहकाकडून देखील Re-charge ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या ‘बेस्ट चलो एप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे बेस्ट उपक्रमातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT