खासदार श्रीकांत शिंदे  esakal
मुंबई

Koliwada Reevelopment : कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण तयार करणार - खासदार श्रीकांत शिंदे

मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी पालिका धोरण तयार करणार आहे. पुनर्विकासात किती एफएसआय व इतर बाबींसाठी नवीन डीसीआर तयार करण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी पालिका धोरण तयार करणार आहे. पुनर्विकासात किती एफएसआय व इतर बाबींसाठी नवीन डीसीआर तयार करण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गील लागेल अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज शिंदे यांनी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन चर्चा केली.

अनेकांची कुटुंबे वाढत असल्याने त्यांना असलेली जागा अपुरी पडते आहे. घरावर वरचा माळा चढवल्यास ते बेकायदेशीर म्हणून पालिकेकडून कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास मार्गी लागावा याबाबत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर पालिका आयुक्त पुनर्विकासाबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनर्विकास करताना पालिकेकडून नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार केला जातो आहे. यासाठी नवे धोरण तयार केले जाणार आहे. यात रहिवाशांना किती एफएसआय देता येईल, इतर प्रश्नही कसे सोडवता येतील हे या धोरणानुसार ठरवले जाणार आहे. त्यामुळे त्यांचा त्याच ठिकाणी पुनर्विकास करावा लागणार आहे. याबाबत पालिका आयुक्त सकारात्मक असून धोरण तयार करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोळीवाड्यांच्या विकासाचा खोळंबा खोळंबा झाला. त्‍यांना आपल्‍या राहत्‍या घराची दुरूस्‍ती व डागडूजी करतानाही अडचणी येतात. त्यामुळे मूळ मुंबईकरांच्‍या पुनर्विकासासाठी स्‍वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी तसेच त्‍यांना अतिरिक्‍त एफएसआय देण्‍यात यावा, कोळवाडे आणि गावठाणांचे सिमांकन करण्‍यात यावे. इमारतींचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा असल्‍यामुळे विकास करताना अडचणी येतात. त्‍यासाठी या इमारतींसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, अशी मागील अनेक वर्षापासून केली जाते आहे.

मुंबईत कोळीवाडे - ४१

गावठाणे - ८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT