New skywalk at Andheri railway station sakal
मुंबई

अंधेरी स्थानकांवर नवीन स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकांवर नवीन स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला झालेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकांवर नवीन स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला झालेला आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकांवर नवीन स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला झालेला आहे. त्यामुळे आता स्थानकांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात एकूण आठ फूट ओव्हर ब्रीज आणि स्कायवॉक कार्यान्वित करण्यात आले असून, आता एकूण फूट ओव्हर ब्रिजची संख्या १४१ वर पोहोचली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी स्थानकांवर ६ मीटर रुंद आणि ९८ मीटर लांबीचा नवीन स्कायवॉक १ ऑगस्ट २०२२ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. हा नवीन स्कायवॉक दक्षिण दिशेच्या जुन्या पादचारी पुला जोडतोय. हा नवा स्कायवॉक पश्चिमेकडून पूर्वेकडे ये-जा करण्यासाठी आणि उलट दिशेने जाण्यासाठी प्रवाशांना मोठी मदत होणार आहे.

तसेच जुन्या दक्षिण फूट ओव्हर ब्रिजवर गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. स्कायवॉकसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च आला आहे. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात एकूण आठ फूट ओव्हर ब्रीज आणि स्कायवॉक कार्यान्वित करण्यात आले असून, आता एकूण फूट ओव्हर ब्रिजची संख्या १४१ वर पोहोचली आहे. याशिवाय, दादर, खार, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकांवरील आणखी पाच फूट ओव्हर ब्रिज या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पश्चिम रेल्वेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Pune Elections 2025 : पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर; ४० प्रभाग चार सदस्यांचे, एक प्रभाग पाच सदस्यांचा

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

SCROLL FOR NEXT