news arena india survey How many seats will BJP and Eknath Shinde Shiv Sena get in Maharashtra Assembly Elections  sakal
मुंबई

Maharashtra Assembly Election : मुंबईवर राज्य कोणाचं? शिंदे गटाची हवा टाईट, ठाकरे गट जिंकणार 'इतक्या' जागा

रोहित कणसे

Maharashtra Assembly Election Survey : राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूकांची जोरदार पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साठी देखील राजकी पक्षांमध्ये हलचालींना वेग आला आहे. यादरम्यान महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभा निवडणूका झाल्या तर कोणता पक्ष बाजी मारेल याबद्दलचा एक सर्व्हे समोर आला आहे. 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रामध्ये भाजपला सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, यापैकी भाजपला 16-18 जाघा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 9- 10 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर विजय मिळेल. राष्ट्रवादीला एक आणि काँग्रेस पक्षाला 5-6 जागांवर विजय मिळेल. तर 5 जागांवर इतरांना विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बोरिवली येथे भाजप पक्षाला विजय मिळेल असे सर्वेत म्हटल आहे. महत्वाचे म्हणजे 4 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागाठाणे येथे एकनाथ शिंदे गाटाचे आमदार सुर्वे त्यांच्या निष्ठावंत मतदारांमुळे आणि गुजराती-उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यामुळे या मतदारसंघात सुमारे 30% मते घेतील. तर जोगेश्वरी पूर्व मध्ये उद्धव ठाकरेंना विजय मिळेल कारण तीनही जागांवर मराठी+मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे असे या सर्व्हेत म्हटलं आहे.

या सर्व्हेमध्ये राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष विजयी होईल याबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे.

राज्यात काय स्थिती असेल?

या सर्व्हेतून विधानसभा निवडणूकीबद्दल अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सध्याच्या घडीला भाजपा राज्यात 123-129, तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 25 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55-56, काँग्रेस 50-53 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17-19 आणि इतर 12 जागा मिळवतील असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT