NIA raids in Mumbai Bangalore  One arrested on charges related to terrorists
NIA raids in Mumbai Bangalore One arrested on charges related to terrorists esakal
मुंबई

Mumbai News : एनआयची मुंबई बंगळुरूत छापेमारी; दहशतवद्यांशी संबंधित आरोपात एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने शनिवारी बंगळूरू आणि मुंबई येथे धाडसत्र केले आहे. आयएसआयएस आणि अल कायदा या जागतिक आतंकवादी संघटनांच्या सोबत संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली .

यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील हमराज शेख (वय 24) वर्षे या उच्चशिक्षीत तरुणाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी कारवाया पसरवण्याचा आणि देशाची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी खेळण्याचा कट प्रकरणात एनआयएने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

झडती दरम्यान संशयितांच्या घरातून डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. काही संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गेल्या महिन्यात याच प्रकरणात एनआयएने कर्नाटकातील सहा ठिकाणी शोध छापेमारी करत दोन आरोपीना अटक केली. दक्षिण कन्नड, शिवमोग्गा,

दावणगेरे आणि बंगलोर येथे कारवाई करण्यात आली होती. उडुपी येथून रेशान थाजुद्दीन शेख आणि कर्नाटकातील शिवमोग्गा येथील वरंबल्ली येथील हुजैर फरहान बेग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती.

या प्रकरणात 19 सप्टेंबर 2022 रोजी शिवमोग्गा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यात आला होता, परंतु नंतर एनआयए ने 15 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा गुन्हा नोंदवत तपास आपल्या हाती घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT