Ashok-Chavan
Ashok-Chavan 
मुंबई

निधी चौधरींना निलंबित करा - अशोक चव्हाण

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवरून काढून टाका, असे ट्‌विट करून गांधीजींचा अवमान करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

निधी चौधरी यांच्या ट्‌वीटसंदर्भात वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी यांचा अवमान करणारे हे ट्विट अत्यंत निषेधार्ह आहे. नोटांवरील महात्मा गांधी यांचे फोटो काढून टाकण्याची, रस्ते, संस्थांना दिलेली नावे काढण्याची; तसेच जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत, ही मागणी आणि ३०-१-१९४८ साठी थॅंक्‍यू गोडसे, अशा आशयाचे अत्यंत खालच्या दर्जाचे ट्‌विट निधी चौधरी यांनी केले होते. अशा विचारांना वेळीच पायबंद घातला पाहिजे.

‘काही विकृत विचारांचे लोक बापूंचे विचार पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महात्मा गांधी व गांधीविचारधारेला संकुचित नजरेतून पाहणारा एक वर्ग आहे आणि त्याचीच री चौधरी यांनी ओढल्याचे दिसून येते. ७० वर्षांत गांधीविचार पुसण्याचा प्रयत्न वारंवार झाला. मात्र आता सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. निधी चौधरींवर कारवाई होते की नाही, यावरून सरकार गांधीविचारधारेसमवेत आहे की गोडसेच्या विचारांसोबत आहे, ते स्पष्ट होणार आहे,’ असे चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT