vikramgad election
vikramgad election sakal media
मुंबई

विक्रमगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळे; युतीचा तब्बल १६ जागांवर विजय

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीच्या (Vikramgad election) नगराध्यक्ष पदासाठी विक्रमगड विकास आघाडीचे नीलेश (पिंका) पडवळे, (Nilesh Padvale) तर उपनगराध्यक्षपदी महेंद्र तुकाराम पाटील (Mahendra patil) यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीची घोषणा विशेष सभेमध्ये पीठासन अधिकारी भवानजी आगे पाटील यांनी केली. विक्रमगड नगरपंचायतीमध्ये (vikramgad nagarpanchayat) १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडी व श्रमजीवी संघटनेच्या युतीने तब्बल १६ जागांवर विजय मिळविला आहे; तर शिवसेनेने केवळ एक जागा मिळाली.

त्यामुळे विक्रमगड विकास आघाडीला पाच वर्षांच्या सत्तेत विरोधकच नाहीत. नगराध्यक्षद व उपनगराध्यक्ष पद निवडीनंतर विक्रमगड शहरात विक्रमगड विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी केली.

विक्रमगडमधल्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. विक्रमगड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. विक्रमगड शहराचा कायापालट करून विक्रमगड शहर हे पालघर जिल्ह्यातील विकासाचे रोल मॉडेल करू.
- नीलेश पडवळे, नवनिर्वाचित नगरध्यक्ष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT