niti ayog central govt everything is ready for opposition meeting shiv sena ubt mp sanjay raut Esakal
मुंबई

Mumbai News : ‘नीती’च्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा डाव - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा आणि लुटण्याचा भयंकर डाव असल्याचा आहे,’’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर, केंद्र सरकारला हा निर्णय घेता आला नसता. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडून सत्ता ताब्यात घेण्यात आल्याचेही ते या वेळी म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणे आणि मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये यासाठीच नीती आयोग विकास करणार हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मुंबई गिळायची आहे. मुंबईचा विकास करण्यासाठी नीती आयोगाची आवश्यकता नाही. त्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये यासाठी दहा वर्षांपासून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालये गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या विकासाची जबाबदारी महापालिका, महाराष्ट्र सरकारची आहे.

आम्ही निष्ठा विकल्या नाहीत

खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी शिवसेना पक्ष सोडण्यासाठी शंभर कोटींची ऑफर असल्याचा दावा केला होता. या संदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले, की आमच्यासह अनेकांना ऑफर आल्या. आम्हाला फोन आले, दबाव होता. परंतु, आम्ही फुटलो नाही, तुरुंगात गेलो. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. शिवसेना सोडून गेलेल्यांना २०२४ मध्ये पश्चात्ताप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT