मुंबई

मविआवरील टीकेनंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरात; युतीची चर्चा जोरात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणामुळे चर्चेत आहेत. या भाषणामध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. शिवसेनेवरील टीकेसोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष असल्याचाही आरोप केला होता. राज ठाकरे सातत्याने आपल्या भूमिका बदलत असून आता त्यांनी हिंदुत्वाला पुरक अर्थात भाजपच्या सोयीची भूमिका घेतली असल्याची विरोधकांकडून टीका केली जात आहे. एकीकडे हे सगळं सुरु असतानाच काल रविवारी रात्री राज ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मनसे मेळाव्यामध्ये तुफान फटकेबाजी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास गडकरी ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी पोहोचले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीवर सडकून टीका आणि दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरींची भेट या साऱ्या घडामोडींमुळे भाजप आणि मनसे या दोन पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, गडकरींनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या दोहोंमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली असली तरी ही भेट निव्वळ वैयक्तीत असल्याचं गडकरींनी सांगितलंय. कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू या भेटीमागे नव्हता, असं त्यांनी स्पष्ट सांगितंलय.

नितीन गडकरी म्हणाले की, ही भेट राजकीय नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून माझे राज ठाकरेंच्या परिवाराशी जवळचे संबंध आहेत. राज ठाकरेंच्या आईची विचारपूसही करायची होती आणि त्यांचं नवं घर पाहण्यासाठी त्यांनी मला बोलावलं असल्याने मी आलो होतो, असं त्यांनी सांगितंलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT