Fire in forest
Fire in forest google
मुंबई

रायगड : आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊनही कारवाई शुन्य; गुन्हा दाखल नाही

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : वातावरणातील बदलामुळे (climate change) दिवसेंदिवस आग लागण्याच्या घटनेत (Fire incidents) वाढ होत आहे. या आगींमुळे वनसंपदेचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत आहे. यात आगी लावण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई (No action against culprit) होत नसल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांत एकाही संबंधितावर वन वनविभागाकडून (Forest Department) गुन्हा दाखल झालेला नाही.

उन्हाळा सुरू झाला की, जंगलामध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. काही दिवसांपासून अलिबाग, रोहा, महाड वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आग लागल्याने जंगलातील सूक्ष्म जीव, पशू-पक्षी, त्यांची घरटी व अंडी, सरपटणारे प्राणी यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. तसेच, जंगलातील लहान-मोठ्या वनस्पती जळून खाक होत आहेत.

मागील आठवड्यात कार्लेखिंड परिसरात आग लागून वनसंपत्ती आणि जैवविविधता जळून खाक झाली आहे. अलिबाग येथील पर्यावरण साथी संघटनेच्या स्वयंसेवकांनी ही आग विझवली. त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही तितकेच सहकार्य केले. अशा घटना सातत्याने होत असल्या, तरी प्रत्यक्षात ही आग कोण लावतो, याचा उलगडा वन विभागाला लावता आलेला नाही. वातावरणीय बदलाने या आगी लागल्याचे वन विभागाचे मत आहे.

शिकारीसाठी आगी

रायगड जिल्ह्यातील जंगलांमध्ये बिबटे, वाघ, ससे, माकड असे विविध प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि विविध वनस्पती आढळून येतात. परंतु, उन्हाळा सुरू झाला की काही ठिकाणी वणवा लागतो. तर काही ठिकाणी शिकार करण्यासाठी आगी लावल्या जातात. शेतकरी मिळालेल्या वनपट्ट्यामध्ये भाताचे रोप लावण्यासाठी राब म्हणजेच जमीन भाजतात. परंतु या सर्वांमुळे जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागते. आग लागल्यामुळे वैविध्यपूर्ण वनस्पतींची व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

जंगलातील आगी या बहुतांश मानवाच्या निष्काळजीपणामुळे लागत असतात. आग लावणारे स्थानिकच असल्याने त्यांची नावे बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यापर्यंत कारवाई होत नाही. आगी लागू नये, यासाठी जनजागृती करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर त्या आगी पसरू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आवश्यक ती मदत स्थानिक वनसमित्यांना केली जाते.

- आशीष ठाकरे, वनसंरक्षक, अलिबाग वन विभाग

रायगडमधील वनक्षेत्र

घनदाट - ७०२.७८
मध्यम- ४९६.७६
तुरळक - ५१६.३७
एकूण १७१५.९१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT