मुंबई

बेस्टच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांनी मिटले डोळे 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या बस दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसी टीव्ही कॅमेरे बेस्टच्या बसमध्ये बसविले होते; परंतु सध्या ते बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कोट्यवधी रुपये खर्च करून बेस्ट प्रशासनाने बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले होते. दहा वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात सुमारे पाच हजार बस होत्या. 40 लाख प्रवासी बसने प्रवास करत होते. सध्या बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात 3,337 बस असून 22 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुमारे दीड हजारांहून अधिक बसमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात आले होते. कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळाही बसला होता. सध्या बहुतांश बसमधील सीसी टीव्ही नादुरुस्त झाले आहेत. काही बसमध्ये तर ते गायबच आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यांवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी प्रवाशांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. सीसी टीव्ही बसवण्याचे कंत्राट संपुष्टात आले असून ते लवकरच पुन्हा नव्याने बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT