मुंबई

सहा महिन्यांपासून वेतनच नाही! 'कोरोना योद्धा' टीएमटी कर्मचाऱ्यांची उपासमार

किरण घरत

कळवा : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी झटणाऱ्या अनेक हातांचा सत्कार, पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मात्र, मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात याच कोरोना योद्धांची उपेक्षा सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत (टीएमटी) कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांची आणि पर्यायाने कुटुंबीयांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या या कर्मचाऱ्यांनी पालिकेने थकीत वेतन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

'टीएमटी'ने तीन वर्षांपूर्वी आपल्या परिवहन सेवेअंतर्गत 'बसवाहक' पदासाठी 430 कामगारांची 'जीए डिजिटल वेब वर्ल्ड' या ठेकेदाराच्या माध्यमातून कासारवडवलीतील आनंदनगर येथील आगारात साडेदहा हजाराच्या ठोक वेतनावर कंत्राटी भरती केली. जानेवारी 2020 ला त्यांचा करार संपला.

मात्र परिवहन प्रशासकाने कोणताही करार न करता 22 मार्चपासून कोरोनाच्या अत्यावश्यक सेवेसाठी या कर्मचाऱ्यांना बसमध्ये व घरोघरी सर्वेसाठी कामावर घेतले आहे. यातील बहुसंख्य कामगार विवाहित आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या हातात वेतनच न पडल्याने कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. याबाबच 'टीएमटी' प्रशासनाने या कामगारांना वेतन देण्यात हात वर केल्याचे समजते.

एकीकडे कायमस्वरूपी टीएमटी कर्मचारी पूर्ण वेतन घेत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनावेतन जीवावर उदार होऊन कोरोनाकाळात घरोघरी सर्व्हेचे काम करावे लागत आहे. हे कर्मचारी सध्या ठेकेदार व टीएमटी प्रशासनाच्या मनमानी कारभारात भरडले जात आहेत.

या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी 'विराट' कामगार संघटननेने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना गुरुवारी (ता. 1) निवेदन दिले असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

परिवहन सेवेचे 430 वाहक कामगार विना वेतनाने गेल्या सहा महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेत काम करीत असून आज निवेदन देऊन विनंती केली आहे. मात्र थकीत वेतन न दिल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल
- शशिकांत कांबळे, कार्यवाहक,
विराट कामगार संघटना      
     

----------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT