Northeast-Mumbai
Northeast-Mumbai 
मुंबई

युतीच्या वादात ‘घड्याळा’ची टिकटिक!

संजय मिस्कीन

मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेनेने सोबत न केल्यास या वेळी वर्चस्व राखणे अवघड होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे कंबर कसली आहे, आव्हान उभे केले आहे.

ईशान्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघ जसा उच्चभ्रू व्यापाऱ्यांच्या रहिवासाचा असला, तरी येथे अत्यंत गरिबी असलेल्या सामान्यांची लोकसंख्याही अधिक आहे. खासदार किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा सरळ संघर्ष शिगेला पोचलेला असल्याने ‘मराठी विरुद्ध अमराठी’चे ग्रहण मतदारसंघाला लागलंय. भाजपचे किरीट सोमय्या येथे खासदार आहेत; मात्र राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. शिवसेना-भाजप युतीच्या वादात या वेळी राष्ट्रवादी आघाडीच्या ‘घड्याळा’ला टिकटिक होण्याचे संकेत आहेत. 

युती झाली तरी सोमय्या यांच्यासाठी काम करणार नाही, असा निर्धारच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे सोमय्यांना उमेदवारी द्यावी की नाही, असा पेच भाजपच्या नेतृत्वासमोर आहे. मतदारसंघातील घाटकोपर, मुलुंड, भांडूप (प.) या परिसरात श्रीमंत व्यापाऱ्यांचा रहिवास आहे, तर विक्रोळी, घाटकोपर (प.) हा चाकरमानी कामगारबहुल मतदार आहे. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मुस्लिम आणि दलितांची संख्या अधिक आहे. मराठी मतदार शिवसेनेसोबत असले, तरी संजय दिना पाटील यांचा संपर्क दांडगा आहे. 

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सोमय्यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये ‘मोदी लाट’ आणि ‘युती’मुळे सोमय्यांनी बाजी मारली; मात्र त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दोन लाख ३३ हजार मते घटली होती. मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचाच बोलबाला असला, तरी लोकसभा निवडणुकीत सतत वेगळे चित्र दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार मागील विधानसभेत ‘किंगमेकर’ ठरला होता. मराठी मतांची विभागणी भाजपच्याच पथ्यावर पडली. या वेळी मनसेचे नेते शिशिर शिंदे शिवसेनेत परतल्याने शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास सोमय्यांना या वेळी ईशान्य मुंबईचा गड राखणे कठीण होईल, असेच चित्र दिसते.

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप - किरीट सोमय्या, प्रकाश महेता
राष्ट्रवादी - संजय दिना पाटील
शिवसेना - शिशिर शिंदे

२०१४ चे मतविभाजन
किरीट सोमय्या (भाजप) - ५,२४,८९५ (विजयी)
संजय पाटील (राष्ट्रवादी) - २,०८,००१

मतदारांमधील नाराजीची कारणे 
    मिठागरांच्या जागांचा विकास रखडला
    नाहूर ते मुलुंड अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष
    रमाबाई आंबेडकरनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास 
    मानखुर्दमधील मुस्लिम कब्रस्तानचा प्रलंबित प्रश्‍न
    मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा अभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT