मुंबई

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रशांत बारसिंग

मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्‍यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. "सरकार माझे आहे' अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकासकामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. 

महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासोबत मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

हुतात्म्यांना अभिवादन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री आदित्य ठाकरे, रविंद्र वायकर, ऍड.अनिल परब, संजय राठोड, माजी मंत्री दिवाकर रावते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, शिवसैनिक यांनीही पुष्प वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. 

WebTitle : not even a penny will go waste says chief minister uddhav thackeray 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT