Notice to Ajit Muthe and other two officers over transport allowance Vasai-Virar Municipal Corporation Sakal
मुंबई

Virar : उपायुक्त सहाय्य्क आयुक्तांना वाहनभत्ता भोवला; अजीत मुठेसह अन्य दोन अधिकाऱ्यांना नोटीस

वसई-विरार महापालिकेच्या कार्यालयीन अभिलेख्यानुसार मासिक वाहन भत्ता मिळत असतानाही पालिकेच्या वाहनांचा वापर करत असल्याने उपायुक्त दीपक झिंझाड, उपायुक्त अजीत मुठे, यांच्या सह अन्य दोन अधिकाऱ्यांना नोटीस

संदीप पंडित

विरार : वसई-विरार महापालिकेच्या कार्यालयीन अभिलेख्यानुसार मासिक वाहन भत्ता मिळत असतानाही पालिकेच्या वाहनांचा वापर करत असल्याने उपायुक्त दीपक झिंझाड, उपायुक्त अजीत मुठे, यांच्या सह अन्य दोन अधिकाऱ्याना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट खुलासा सादर करण्याचे आदेश आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या तत्कालिन महासभेने आयुक्तांपासून सहाय्यक आयुक्त अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी ‘वाहन भत्ता` सुरू करून त्यांना पालिकेकडून देण्यात आलेली वाहने काढून घेतली होती; परंतु पालिकेतील बहुतांश अधिकारी आजही वाहनभत्ता घेत आहेत. शिवाय पालिकेचे वाहनही वापरत आहेत.

विशेषत: अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अजीत मुठे यांच्याकडून स्वयंस्पष्ट खुलासा मागविण्यात आला आहे. उपायुक्त अजीत मुठे यांच्याकडे जानेवारी 2023 मध्ये ‘सीयूसी विभागा`चा कार्यभार होता. मात्र त्यांना स्वतंत्र वाहन देण्यात आलेले होते. त्यांच्या बदलीनंतर तत्कालिन उपायुक्त किशोर गवस, संघरत्ना खिल्लारे यांच्याकडे हा कार्यभार होता.

मात्र त्यांनीही त्यांच्या कार्यकालात वाहनभत्त्यासह पालिकेच्या वाहनाचा वापर केलेला होता. आता हा कार्यभार पुन्हा उपायुक्त अजीत मुठे यांच्याकडे आहे. त्यामुळे या विभागाचे उपायुक्त दीपक झिंझाड व उपायुक्त अजीत मुठे यांनी पुन्हा या वाहनाचा वापर सुरूकेलेला आहे.

विशेष म्हणजे; पालिकेच्या या वाहनाचा वापर हे अधिकारी त्यांना घरून येण्यासाठीही करत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. उपायुक्त अजीत मुठे यांचे निवासस्थान वसई येथील अगरवाल पॅरामाऊंट या इमारतीत आहे.

तेथून पालिकेत येण्यासाठी उपायुक्त अजीत मुठे या वाहनाचा वापर करत असल्याचे सांगितले जाते. यानिमित्ताने अन्य पालिका अधिकाऱ्यांचाही वाहन भत्ताही बंद करण्यात यावा; किंबहुना आतापर्यंत झालेल्या वाहन इंधनाचा लाखो रुपयांचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चार ते पाच जणांना खुलासा मागविण्यात आला असून, काही जणांनी खुलासा सादर केलेला आहे. त्यावर लेखा व लेखापरीक्षण विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला असून, योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

-अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT