OBC Melawa 
मुंबई

OBC Melawa: "ओबीसींच्या हाती सत्ता द्या, ५ वर्षात मराठ्यांची गरिबी दूर करू"; प्रकाश शेंडगेंचं आवाहन

ओबीसींची जातीय जनगणना करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी संबोधित केले.

Sandip Kapde

OBC Melawa:ओबीसींचा एल्गार मेळावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात घेण्यात आला. या मेळाव्यात ओबीसींची जातीय जनगणना करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी संबोधित केले.

प्रकाश शेंडगे म्हणाले, जरांगे पाटील यांच्या गावातून आम्ही लढ्याला सुरुवात केली. ही लढाई ३६५ जमातीची आहे. जरांगे म्हणतात आपण धाकटे भाऊ आहोत. मग गेल्या ७५ वर्षात तुम्ही आम्हाला आमचा वाटा दिला का?. कारखाने, बँका, संस्था, सुतगिरणी सर्व तुमच्याकडे आमच्याकडे मात्र उसतोडी, हमाली, विटभट्टी हा सर्व घाट्याचा वाटा आमच्याकडे आला.

मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मराठा समाजाची मागणी होती. मराठ्यांच्या मोर्च्यामध्ये ४० टक्के ओबीसी समाज होता. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही, त्याची शिक्षा ओबीसींना देणार का?, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला.

मराठ्यांना गरिबी ओबीसीमुळे नाही तर त्यांच्याच नेत्यांमुळे आली आहे. शेतकरी नेते, मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांचे मग गरिबी कशी आली. माझी सर्वांना मराठा समाजाला देखील विनंती आहे. एकदा ५ वर्ष ओबीसींच्या हाती सत्ता द्या, मराठ्यांची गरिबी दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Threatens Trump Assets : इराणचा वर्मावरच घाव ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखातातील मालमत्तांवर हल्ला करण्याचा इशारा, यादीच केली जाहीर

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय; २५ लाख कुटुंबांना मिळणारी मोफत साडी यंदापासून बंद; 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' गुंडाळली

Latest Marathi News Live Update : आंध्र प्रदेशात कोविडचे १२ रुग्ण आढळले, चौघांचा मृत्यू

Success Story: २५० रुपायांतून सुरू केलेला व्यवसाय बनला आज ८००० कोटी रुपयांचा! पत्रकारितेतून कशी सुचली भन्नाट बिझनेस आयडिया?

Maharashtra Politics : ...म्हणून जयंतराव एकत्र गेले असावेत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' भेटीवर चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय गुपित उघड केलं?

SCROLL FOR NEXT