Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting
esakal
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील एकाचवेळी जाण्यामागे वेगळे काही कारण असेल असे वाटत नाही. त्यांचे काहीतरी सामायिक काम असेल. अन्यथा, कुणाला सोबत घेण्याबाबतचा प्रस्तावच आमच्यासमोर नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना (Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting) दिले.