Omicron variant sakal media
मुंबई

मुंबई : ओमिक्रॉनचे मुंबईत 10 संशयित रूग्ण

भाग्यश्री भुवड

मुंबई : संपूर्ण जगभरात सावट असणाऱ्या ओमिक्रॉनचा (Omicron variant) मुंबईतही शिरकाव झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ओमिक्रोनचे 10 संशयित रूग्ण (omicron suspected patients) आढळले आहेत. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसह (south Africa) इतर जोखमी देशातून आलेल्या एकूण 485 प्रवाशांच्या चाचण्या (Travelers corona test) मुंबई महापालिकेतर्फे (BMC) करण्यात आल्या.

यापैकी 9 प्रवासी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेला एक असे 10 जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल उद्या येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 40 रिस्की कंट्रीतील प्रवाशांपैकी 10 संशयित आढळल्याने ओमिक्रॉन विषाणू मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्यानंतर मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला. मात्र आता दक्षिण आफ्रिकेसह 40 देशांत ओमायक्राॅन विषाणू आढळला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. शिवाय नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जिन’ चाचणीही केली जाणार आहे. या ‘एस-जिन’ चाचणीचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे नव्या व्हेरिएंटची शक्यता आणि जिनोम सिक्वेसिंग चाचणी व पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळणार आहे.

21 वर्षाचा पुरुष जो 10 नोव्हेंबर रोजी लंडनहून आला. तर 47 वर्षीय व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी मॉरिशसहून आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला 39 वर्षांची व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी तर लंडनहून आलेला 25 वर्षांचा पुरुष जो रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडला आहे तो 1 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याच सोबत या प्रवाश्यांचा संपर्क ट्रेसिंग सुरू असून दक्षिण आफ्रिकेतील एक 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिला देखील सेव्हन हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर नमुना जिनोम सिक्वेन्सीग चाचणीसाठी पाठवला आहे.

लंडनहून 17 नोव्हेंबर या दिवशी 69 वर्षीय पुरूष, 25 नोव्हेंबर रोजी पोर्तुगालहून आलेली 69 वर्षीय व्यक्ती,  लंडनहून 34 वर्षांची व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झाली. लंडनहून 13 नोव्हेंबर या दिवशी 45 वर्षीय पुरूष तर,  जर्मनीहून 2 डिसेंबर या दिवशी आलेली 38 वर्षीय व्यक्ती संशयित म्हणून सापडला आहे.  पालिकेने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित  आहेत. सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT