representative photo
मुंबई

मरीनड्राइव्ह: गाडीत बसलेल्या व्यक्तीच्या डोक्याला बुंदक लावली आणि...

पती-पत्नी गाडीत बसलेले असताना आरोपी मागचा दरवाजा उघडून सीटवर बसला.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई सुरक्षित शहर समजलं जातं. पण अलीकडे मुंबईत गुन्हेगारीच्या (Mumbai crime) घटना वाढत चालल्या आहेत. मागच्याच आठवड्यात साकीनाक्यामध्ये (Sakinaka) एका महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार झाल्याची भयानक घटना घडली होती. आता कालच म्हणजे बुधवारी रात्री आठच्या सुमारास प्रसिद्ध मरीनड्राइव्ह (Marine drive) येथे गाडीत बसलेल्या एका व्यावसायिकाच्या (businessman) डोक्याला बंदुक लावून पैशांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे.

व्यावसायिक आपल्या पत्नीसोबत गाडीत बसलेला असताना अचानक एक व्यक्ती गाडीचा मागचा दरवाजा उघडून सीटवर बसली. अनोळखी आरोपीने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीच्या डोक्याला बंदुक लावून पैशांसाठी धमकावले. या प्रकरणी व्यावसायिकाने मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी ही घटना आहे. मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळत चालल्याचे हे लक्षण आहे. मरीनड्राइव्ह हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. मरीनड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर भ्रमंती करण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

ढिंग टांग : डीजे : शाप की वरदान..!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे आक्रमक; उपमुख्यमंत्री शिंदे-खासदार जाधवांना निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT