Kidnapped boy with his family
Kidnapped boy with his family 
मुंबई

दीड वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास बोईसर येथे अटक

सकाळ वृत्तसेवा

कळवा : दिवा येथील दीड वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यास आज (शुक्रवार) अटक करण्यात आली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग 1 चे पोलिस अधिकारी आणि मुंब्रा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे स्वाधीन केले.  

या  दीड वर्षीय मुलाचे गणेश तलाव येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी मुलाच्या उत्तर प्रदेश येथील काकांकडून 5 लाख रुपये खंडणीची मागणी अपहरणकर्त्याने केली होती. मोनू कुमार पासी यांचा दीड वर्षांचा मुलगा आकाश हा शनिवारी (ता.6) सायंकाळी 6 च्या सुमारास आपल्या घराजवळ मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी नागेश पासी याने या मुलाला फसवून पळवून नेले होते.

त्यानंतर दोन दिवसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मुलाच्या काकांना फोन करून मुलाच्या सुटकेसाठी 5 लाखाची खंडणी मागितली होती. त्या संदर्भात मुंब्रा पोलिसांत मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण 1चे पथक व मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एस. कड यांच्या सयुंक्त पथकाने तपास व धडक कारवाई करून आरोपी नागेश पासी याला शुक्रवार (ता. 12) ला सकाळी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे सापळा रचून अटक केली.

या वेळी दीड वर्षाच्या मुलाला पासी याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या यशस्वी कामगिरीसाठी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT