मुंबई

आधी कर्जाचे प्रलोभन; नंतर गैरव्यवहाराची भीती! साडेबारा लाखांच्या खंडणीप्रकरणी एकाला अटक

अनिश पाटील

मुंबई  ः बिनव्याजी कर्जाचे प्रलोभन दाखवल्यानंतर याप्रकरणी गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवत साडेबारा लाखांची खंडणी उकळल्याची घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
मानखुर्द टी-जंक्‍शन येथील रहिवासी असलेल्या हस्तगीर इब्राहिम शेख (वय 35) यांना नवा व्यवसाय सुरू करायचा होता. तसेच आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे उपचारासाठी त्यांना पैशांची आवश्‍यकता होती. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे प्रलोभन दाखवले. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेख यांनीही तत्काळ 50 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी शेख यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंकेची माहिती आदी कागदपत्रे घेतली.

मात्र काही दिवसांतच आरोपींनी बिनव्याजी कर्ज देणे हे कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा असून तुमच्यावर गुन्हा दाखल होत असल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशीही भीती शेख यांना दाखवली. सुरुवातीला शेख यांनी भीतीपोटी काही रक्कम आरोपींना दिली. त्यानंतर आरोपींनी शेख यांना पैशांसाठी धमकावण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत आरोपींनी तक्रारदार शेख यांच्याकडून 12 लाख 25 हजार रुपये उकळले, त्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी नुकतीच शेख यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. 
अखेर या धमकावण्याला कंटाळून शेख यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अझीमुद्दीन शहादत अली कुडाळकर (वय 48) याला अटक केली. याप्रकरणी जमाल आली काझी, वकील आमीर सिद्धीकीसह आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सहभागाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून या वर्षी 2 जानेवारीपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. 
One arrested for Rs 12.5 lakh ransom in mumbai

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT