liquor seized at mumbai
liquor seized at mumbai 
मुंबई

मुंबईत सव्वा कोटींचा मद्‌यसाठा जप्त (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तुर्भे पोलिसांनी बुधवारी (ता. 10) पहाटे तुर्भे एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारुन त्याठिकाणी पूर्वीपासून साठवून ठेवलेला व एका मोठया कंटेनरमध्ये आढळून आलेला तब्बल सव्वाकोटी रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. हरियाणा राज्यात पाठवण्यासाठी आलेला मद्याचा साठा तब्बल 60 लाख रुपये राज्य सरकारच महसुल बुडवून चोरीने आणला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुरक्षारक्षक आणि कंटेनरचालकाला अटक केली असली तरी, त्यामागचे मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांचा शोध सुरू केला आहे. 

तुर्भे एमआयडीसीतील प्लॉट नं. डी-85 समोर बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद कंटेनर आल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून सदर कंटेनर ताब्यात घेतला. बंद असलेल्या कंपनीमध्ये तपासणी केली असता, एक कंटेनर इतका मद्याचा साठा त्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी सकाळपासून कंटनेर आणि कंपनीमधील मद्याच्या साठयाची मोजदाद केली असता सुमारे सव्वाकोटी रुपये किमतीची दारू असल्याचे त्यांना आढळले.

पोलिसांनी मद्याचा साठा जप्त करून सुरक्षारक्षक आणि कंटेनरचालक दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्यांच्याकडून मद्याच्या साठ्याबाबत योग्य प्रकारे माहिती मिळत नसल्याचे तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सांगितले. 

हरियाणा राज्याचा टॅग 
मद्याच्या साठयामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची व्हिस्की आणि बियरचा साठा मोठ्या प्रमाणात असून बाटल्यांवर हरियाणा राज्याचा टॅग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर मद्य फक्त हरियाणा राज्यातच पोहचणे आवश्‍यक असताना, तो नवी मुंबईत कसा दाखल झाला याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. इतका मोठा मद्याचा साठा या ठिकाणी आणून ठेवण्यामागचा उद्देश काय आहे याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT