One woman looted to a elderly woman at Ulhasnagar
One woman looted to a elderly woman at Ulhasnagar  
मुंबई

उल्हासनगर : वयोवृद्ध महिलेला मदत करण्याच्या बहाणे लूटले

दिनेश गोगी

उल्हासनगर : एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेला मंदिरात सोडते म्हणून तिचा हात पकडून तिच्या हातातील सोन्याची हाताची बांगडी खेचून एक महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना काल भरदुपारी भाटिया चौकात घडली आहे.

वयोवृद्ध महिलेचा हात धरून तिला मंदिरात नेताना आणि काही क्षणात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी खेचून पळणारी महिला व वयोवृद्ध असतानाही पळणाऱ्या महिलेचा पाठलाग करणारी वयोवृद्ध महिला हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

कॅम्प नंबर 3 मधील 17 सेक्शन टेकडीवर राहणाऱ्या लाजवंती पहिलाजानी या 65 वर्षीय महिलेला कॅम्प नंबर 5 मध्ये भाटिया चौकात असलेल्या संतोषी माता मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. तिने रिक्षा थांबवली. त्या रिक्षात एक महिला देखील बसली आणि मी तुम्हाला मंदिरात सोडवते असे म्हणाली. भाटिया चौक येताच मंदिरात सोडण्यासाठी त्या महिलेने वयोवृद्ध महिलेचा हात पकडला आणि काही क्षणातच वयोवृद्ध महिलेच्या हातातील बांगडी खेचून पळ काढला. वयोवृद्ध महिलेने तिचा पाठलाग केला. पण ती महिला ज्या रिक्षात आली होती. त्या रिक्षात बसून पळून गेली. याप्रकरणी प्रथम हिललाइन पोलिस ठाण्यात अनोळखी महिला व रिक्षा चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी महिला ही वयोवृद्ध महिलेसोबत 17 सेक्शन मधून रिक्षात बसल्याने हा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याने लवकरच तिच्या मुसक्या आवळल्या जाणार अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT