मुंबई

दप्तराचे ओझे आणि स्मार्ट फोनमुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय हा विपरीत परिनाम

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अलीकडे मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुलांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास तर होतच आहे, मात्र हल्ली मुले स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर एक विपरीत परिनाम होत असल्याचे एम्स च्या अभ्यासात समोर आले आहे. मुलांना दप्तराचे ओझे आणि एकाच स्थीतीत अनेक काळ बसून मोबाईल वापरण्याच्या सवयीमुळे मुलांना स्नायु व हाडांच्या दुखण्याचा त्रास होत असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. 

एम्सच्या अभ्यासात आढळले की, दप्तराचे ओझे मुलांचे स्नायू आणि हाडे कमकुवत करते. सरकारी शाळांमधील 63 टक्के मुले स्नायू आणि हाडांच्या दुखण्याने ग्रस्त असल्याचे आढळले. तसेच या समस्येवर अभ्यास करणारे डॉक्‍टर म्हणतात की, मुलांमध्ये हाडांच्या दुखण्याची समस्या टीव्ही पाहणे आणि स्मार्टफोनचा जास्त वापर करूनही दिसून येत आहे. एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत एम्सच्या रूमॅटोलॉजी विभागाने हा अभ्यास केला होता. 

10 शाळांमधील 1600 मुलांवर अभ्यास 
एम्सचे रिमेटोलॉजी विभागागाचे प्रमुख, डॉ. उमा कुमार म्हणाले की, दक्षिण दिल्लीतील 10 शाळांमधील 1600 मुलांवर हा अभ्यास केला गेला. त्यात 10 ते 19 वर्षांच्या मुलांचाही समावेश होता. अभ्यासानुसार, 63 टक्के मुले वेदनांनी ग्रस्त असल्याचे आढळले. 32 टक्के मुलांना पाठदुखीचा त्रास होता. यापैकी बहुतेक मुलांना 1 वर्षापेक्षा जास्त काळ हा प्रकार होता. 


सकस आहारा अभावी हाडांचे दुखणे 
डॉ. उमा कुमार म्हणाले की, मुलांना सकस आहार मिळ नसल्यामुळे स्नायू आणि हाडे दुखतात. तसेच जी मुले दिवसातून दोन तास आणि आठवड्यातून पाच दिवसांपेक्षा जास्त स्मार्टफोन वापर तसेच टीव्ही पाहतात अशा मुलांना हा त्रास होऊ शकतो. 

प्रदुषणामुळे संधिवात 
प्रदूषणामुळे संधिवात होऊ शकतो. एम्सच्या अभ्यासातून हा खुलासा झाला आहे. गेल्या 10 किंवा त्याहून अधिक वर्षांपासून दिल्लीत राहणार्या 350 निरोगी रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात प्रदूषणामुळे संधिवातसदृश आजाराचे प्रमाण 20 टक्के लोकांमध्ये वाढल्याचे आढळले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT