Mumbai Lok Sabha Consituency Elections esakal
मुंबई

यंदा अपक्ष उमेदवारांचे पेव फुटले!

मुंबईत ५० जण निवडणूक रिंगणात; चर्चेत नसलेल्या पक्षांचीही भाऊगर्दी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Lok Sabha Constituency : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अश्यात मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचे पेव फुटले आहे. सर्व सहा मतदारसंघांत ११६ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यामध्ये अपक्षांची संख्या तब्बल ५० एवढी मोठी आहे. त्याचबरोबर कधीही चर्चेत नसलेल्या पक्षांचे उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या मत उत्सवात कोण कोणाला मात देणार, कोण कोणाची मते खाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सहा लोकसभा मतदारसंघ असून त्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार आठ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार असून त्यामध्ये ६६ उमेदवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तर ५० उमेदवार अपक्ष आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे सर्वाधिक २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये १७ उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडून तर ११ उमेदवार अपक्ष आहेत.

अपक्षांची संख्या मोठी का?

निवडणूक आखाड्यात अनेक प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला शह देण्यासाठी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले जाते. तसेच समोरील उमेदवाराला एखाद्या विभागात मिळणारी मते किंवा समाजाच्या मतांची विभागणी करण्यासाठी अनेकदा अपक्ष उमेदवारांना पुढे करण्याची खेळी केली जाते. तीच युक्ती अनेकांनी मुंबईत लढवल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT