मुंबई

उत्पन्नाबाबत BMC कडून लपवाछपवी; विरोधी पक्षनेत्यांचा गंभीर आरोप

समीर सुर्वे


मुंबई  : कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मालमत्ता कर आणि विकास निधीतून आतापर्यंत केवळ 1400 कोटींच्या आसपास वसुली झाली. उर्वरित वसुलीबाबत पालिकेकडून कोणतीही माहिती सादर केली जात नसल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या उघड केले. 

मालमत्ता करातून महापालिकेला यंदा 6 हजार 768 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात डिसेंबरअखेरपर्यंत 734 कोटी रुपयांची वसुली झाली. उत्पन्नाचा दुसरा प्रमुख स्रोत असलेल्या विकासनिधीतून 3 हजार 879 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना केवळ 708 कोटींची वसुली झाल्याचे रवी राजा यांनी सांगितले. याचा अर्थ असा, की अंदाजित उत्पन्नाच्या 15 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित उत्पन्नाच्या वसुलीबाबत प्रशासनाने माहिती सादर करणे गरजेचे होते; मात्र प्रशासन पालिकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत स्थायी समितीला माहिती देत नाही. कोरोनाकाळातील आर्थिक परिस्थितीबाबत श्‍वेतपत्रिका काढणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपही राजा यांनी केला. 

कोव्हिडचा खर्चही महसुली खर्चात 
यंदा अंदाजित महसुली खर्च 3 हजार 800 कोटी रुपये असताना तो आतापर्यंत 3 हजार 200 कोटी झाल्याचा आरोप राजा यांनी केला. कोव्हिडचा खर्चही या महसुली खर्चात दाखवण्यात आला आहे. राजा यांच्या या मुद्द्याचे समर्थन भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही केले. प्रचलन आणि परीक्षणाच्या नावाखाली पालिकेने कोव्हिडचा खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला. 

-----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Opposition leader Ravi Raja told the standing committee that no information was being submitted by the municipality regarding the remaining recovery of bmc 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

Railway Ticket Upgrade : स्लीपरच्या पैशात AC चा प्रवास! तेही एकही रुपया जास्त न देता? जाणून घ्या काय आहे रेल्वेचा ऑटो अपग्रेड नियम

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Pune: परवानगी नसेल तर सभा महागात पडणार अन्...; पुणे महापालिकेचे रॅली-सभांसाठी कडक नियम लागू

Capricorn Yearly Horoscope 2026: राहु, शनि आणि गुरु कसा बदलणार तुमचं आयुष्य; वाचा संपूर्ण वार्षिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT