BJP Meeting
BJP Meeting sakal media
मुंबई

मोखाडा : भाजपचा स्वबळाचा नारा; प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

भगवान खैरनार

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा (Palghar-Mokhada), विक्रमगड आणि तलासरी या तीन नगरपंचायतीच्या निवडुकांसंदर्भात (Nagar Panchayat Election) मुंबईतील भाजप (Mumbai bjp meeting) प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे. या निवडणुकीची रणनीती (Election strategy) आखण्यात आली असुन तिनही ठिकाणी भाजपने स्वबळाचे दंड थोपटून, (Own fight in election) निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निवडणुकीत वरिष्ठ नेते प्रचारात सक्रीय होणार असल्याने, भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 

पालघर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे युती, आघाडीचे गणिते जुळविण्यात राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. ह्या निवडणुकीची तयारी आणि रणनीती आखण्यासाठी भाजपची प्रदेश कार्यालयात, पालघर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली आहे. ही बैठक माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे. यावेळी पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी या तिन्ही नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या ईतर पक्षांशी होणार्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी पालघर जिल्ह्यात, भाजपचे केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कोकण विभाग अध्यक्ष, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे हे प्रचारात सक्रीय सहभाग घेणार असून मोखाडा नगरपंचायतीचे प्रभारी म्हणून आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव डाॅ हेमंत सवरा यांच्यावर जबाबदारी दिल्याचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी सांगितले आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीस केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय , कोकण विभाग अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रदेश पदाधिकारी बाबाजी काठोळे, आदिवासी विकास आघाडी प्रदेश सचिव डाॅ हेमंत सवरा, तसेच तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT