Tungareshwar Wildlife Sanctuary esakal
मुंबई

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! तुंगारेश्वर अभयारण्यात जाणार असाल, तर थांबा; पर्यटनाबाबत वन अधिकाऱ्यांनी घेतलाय 'हा' निर्णय

तुंगारेश्वर अभयारण्यातील वर्षा ऋतूमधील आल्हाददायक वातावरणाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते.

सकाळ डिजिटल टीम

यावर्षी या अपघाताचा धोका लक्षात घेत वन परीक्षेत्र अधिकारी तुंगारेश्वर उत्तर वन्यजीव अभयारण्य यांनी वर्षा सहलीच्या पर्यटकांस प्रतिबंध घातला आहे.

विरार : पालघर जिल्हा, तसेच वसई तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांवर (Palghar Tourism) पावसाळ्यात पर्यटक गर्दी करत असतात. परंतु, येणाऱ्या पर्यटकांना येथील समुद्राच्या किंवा धबधब्याच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात.

त्याच प्रमाणे वर्षा पर्यटनासाठी अनेकजण तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात (Tungareshwar Wildlife Sanctuary) जातात. परंतु, हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना (Tourists) ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली असल्याचे उत्तर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य अधिकारी संदीप चौरे यांनी सांगितले.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला (Mumbai-Ahmedabad National Highway) लागून असलेला तुंगारेश्वर अभयारण्य हा परिसर मुंबई, ठाणे मीरा-भाईंदर, तसेच वसई विरार शहरालगत येत असल्याने सुट्टीच्या दिवसात तुंगारेश्वर अभयारण्यातील वर्षा ऋतूमधील आल्हाददायक वातावरणाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते.

तसेच या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिर परिसरातील चिंचोटीसारख्या धबधब्यातील कुंडांच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दरवर्षी या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यावर्षीही या अपघाताचा धोका लक्षात घेत वन परीक्षेत्र अधिकारी तुंगारेश्वर उत्तर वन्यजीव अभयारण्य यांनी वर्षा सहलीच्या पर्यटकांस प्रतिबंध घातला आहे.

सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रवेश बंदी असल्याने अवैधरित्या अभयारण्यात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT