Elections
Elections sakal media
मुंबई

पालघर जिल्हापरिषदेसाठी सलग तिसऱ्या दिवशी एक गटामध्ये उमेदवारी अर्ज

प्रकाश पाटील

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या (palghar ZP elections) पोटनिवडणुकीसाठी गेल्या तीन दिवसात एका गटात उमेदवारी अर्ज (Candidate application) दाखल झालेला आहे. अजूनही विविध पक्षातील (political parties) इच्छुक असलेल्या उमेदवारांवर शीक्कामोर्तब न झाल्यामुळे काही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे (no applications) समजते. उद्या मात्र उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होण्याचे संकेत मिळत आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या व विविध पंचायत समितीच्या 29 रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झालेली आहे पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज लेला नव्हता तर दुसर्‍या दिवशीही दुपारपर्यंत अर्ज दाखल झालेले नाही काल तिसऱ्या दिवशी एका गटात अर्ज दाखल झाला आहे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख पक्षामध्ये रिक्त झालेल्या जागांवर उमेदवारी देण्यासाठी अजूनही मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे अर्ज दाखल झालेले नाहीत

जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या रिक्त पदांवर सर्व पक्ष एकला चालो रे या उक्तीप्रमाणे निवडणूक लढवणार आहेत. बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीत असली तरी या पोटनिवडणुकांमध्ये ती स्वतंत्रपणे लढणार आहे. असे आधीच एका प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेस पक्ष ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असे एका पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. बुधवारी मनोर येथे आलेले केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनीही भाजपा सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मा कपही त्याच सूत्रावर ठाम आहे. शिवसेना व राष्ट्रवादी महा विकास आघाडीतील घटक असले तरी उमेदवारी वाटपावरून या दोघांमध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी ही आपले स्वतंत्र उमेदवार पोटनिवडणुकीसाठी उभे करतील अशी चर्चा आहे.

शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत कलह असल्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. एकमेकांचे शत्रू एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे पक्षाचेच काही जण या उमेदवारांना पाडण्यासाठी इतरांशी हातमिळवणी करू शकतात. अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. पालघरच्या जव्हार वाडा विक्रमगड या ग्रामीण भागामध्ये भाजपचा चांगला पगडा असला तरी त्याठिकाणी आता राष्ट्रवादी हा पक्ष विस्तार न गेला त्यामुळे भाजपला राष्ट्रवादीच्या रुपाने नवे आव्हान आहे, असे असले तरी या भागामधले राष्ट्रवादीचे मोठे पक्ष नेतृत्व व स्वबळावर निवडून आलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट यांच्या भांडणाचा लाभ भाजपाला होईल अशी चर्चा आहे.

अलीकडेच राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मोठे वाद उफाळून आले होते. त्यामुळे मूळ राष्ट्रवादीचे असणाऱ्या गटामार्फत विरोधी राष्ट्रवादी गटाला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या दोघांच्या भांडणात भाजपला मते मिळण्याची दाट शक्यता आहे तलासरी डहाणू तालुक्यात माकपच्या मताधिक्क्याने माकपचे आमदार निवडून आले असल्यामुळे या भागांमध्ये माकपच्या उमेदवारांना मते मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली तरी राष्ट्रवादी व भाजपही या भागांमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील असे दिसून येते. अलीकडच्या काळात डहाणूच्या भागांमध्ये राष्ट्रवादीने आपला पगडा आणखीन मजबूत केल्यामुळे भाजपाला या ठिकाणी राष्ट्रवादी च्या रूपाने मोठे आव्हान आहे. पंचायत समितीमध्ये ही सर्वत्र हीच स्थिती राहणार आहे त्यामुळे ही पोटनिवडणूक रंगतदार होणार असेच एकंदरीत दिसून येत आहे.

पालघर तालुक्यातील नऊ, डहाणू व वसई तालुक्यातील प्रत्येकी दोन तर वाडा तालुक्यातील एक नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेली पदे रिक्त झाली होती. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यातील वाडा, पालघर, डहाणू व वसई तालुक्यांमध्ये असलेल्या 14 पंचायत समितीचे जागा रिक्त करून नंतर सहा जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग व उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण उमेदवारांसाठी निवडणुका घेण्याचे निर्णय घेण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT