मुंबई

'त्या' नराधमाला 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : शेजारी रहाणाऱया सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया कन्हैयालाल जवाहरलाल पाल (21) या तरुणाला पनवेल येथील अतिरिक्त संत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी 10 वर्षे सक्त मजुरी व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना डिसेंबर-2014 मध्ये पनवेलच्या लक्ष्मी वसाहतीतीत घडली होती. 

या घटनेतील आरोपी कन्हैयालाल पाल हा पनवेलच्या लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीत रहाण्यास असून 6 वर्षीय पिडीत मुलगी देखील त्याच भागात रहाणारी आहे.18 डिसेंबर-2014 रोजी आरोपी कन्हैयालाल पाल याने चहा पिण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीला आपल्या घरात बोलावून तीच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी आरोपी कन्हैयालाल याला बलात्कार आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सदर गुह्याचा तपास पुर्ण करुन सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात सुरु होती. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड.अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविली.यात पिडीत मुलगी व तीची आई तसेच प्रत्यक्ष साक्षिदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच तपासीक अमंलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष गवळी यांचा तपास महत्वाचा ठरला.त्यानंतर न्या.राजेश अस्मर यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरुन आरोपी कन्हैयालाल याला दोषी ठरवत त्याला 10 वर्षे सक्त मजुरीची तसेच 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची पुर्ण रक्कम 12 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पिडीत मुलीस देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

WebTitle : panvel man sentenced ten years of jail  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT