Hospital sakal
मुंबई

मुंबई : पालकांनो ,मुलांची नोंदणी करा : नायर मध्ये 18 मुलांवर चाचणी

गेल्या आठवड्याभरात एका ही मुलाची नोंदणी झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नायर रुग्णालयात लहान मुलांवरील कोवोवॅक्स लसीच्या ट्रायलला सुरूवात झाली आहे. गुरुवार पर्यंत 18 मुलांवर लसीची चाचणी घेण्यात आली आहे. मात्र दिवाळीच्या सुट्टीत सहलीला तसेच गावी उत्सव साजरा करण्यासाठी गेलेल्या पालक- मुलांमुळे या ट्रायलसाठीचा प्रतिसाद आणखी घटला आहे.गेल्या आठवड्याभरात एका ही मुलाची नोंदणी झाली नाही.

पालिकेच्या नायर रुग्णालयाची निवड कोवोवॅक्सच्या लसीच्या चाचणीसाठी केली. लसीची ट्रायल सुरू झाली आहे.पालिकेच्या नायर रुग्णालयात 2 ते 17 वयोगटातील 920 मुलांवर ही ट्रायल घेण्यात येणार आहे. 15 दिवसात 15 मुलांवर ही चाचणी करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसात केवळ 3 मुलांची चाचणी करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सहली तसेच गावी गेलेल्या नागरिकांमुळे ही घट झाली आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी तीन गट बनवण्यात आले आहेत. यामध्ये 2 ते 7 वर्षे, 8 ते 11 आणि 12 ते 18 वर्षे असे वयोगट तयार करण्यात आला आहे.

मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायलसाठी नोंदणी सुरू आहेत . दिवाळीमुळे हा प्रतिसाद कमी झाला आहे. मात्र दिवाळीपूर्वी पालक लसीसाठी विचारणा करत होते. दिवाळीनंतर प्रतिसाद वाढेल असे डॉ.रमेश भारमल,संचालक,वैद्यकीय शिक्षण व पालिका प्रमुख रुग्णालय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT