धैर्य, विश्‍वास अन्‌ सहानुभूती; बिग बींनी शेअर केला 22 भाषांमधून संदेश देणारा व्हिडीओ 
मुंबई

धैर्य, विश्‍वास अन्‌ सहानुभूती; बिग बींनी शेअर केला 22 भाषांमधून संदेश देणारा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश एकवटला झाला आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर करून त्याचाच पुरावा दिला आहे. या चित्रफितीत देशातील वेगवेगळ्या 22 भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन संदेश देत आहेत. 

बिग बी यांनी ट्‌विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. ते म्हणतात, भारतातील या भाषा धैर्य, विश्‍वास आणि सहानुभूतीचा महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सर्व नागरिकांना एकत्र आणि सकारात्मक राहण्यास सांगितले आहे. सध्या कोरोनामुळे लोक घरांतच अडकले असले, तरी देशभावनेमुळे एकत्र आले आहेत. आताच्या कठीण परिस्थितीत हे धैर्यच महत्त्वाचे आहे, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. 

या व्हिडीओत मराठी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्‍मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिशी, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषा बोलणारे लोक एकत्र आले आहेत. धैर्य, विश्‍वास आणि सहानुभूती यांचे महत्त्व ते सांगत आहेत. अमिताभ बच्चन नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असतात. ते अशा प्रकारचे संदेश देणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टना चाहते भरभरून प्रतिसाद देतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करणारी शॉर्ट फिल्म तयार केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT