sion hospital 
मुंबई

सायन रुग्णालयात घडलेल्या 'त्या' प्रकारामुळे रुग्णांना झाला मानसिक त्रास; योग्य ती काळजी घेण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे निर्देश

मिलिंद तांबे

मुंंबई: सायन रुग्णालयाकडून मृत शवांची हेळसांड झाली असून शवांचा अनादर झाला असल्याचा ठपका ठेवत हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोगाने नोंदवले. यानंतर शवांबाबत बाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश ही आयोगाने रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

सायन रुग्णालयातील कोरोना वॉर्ड मध्ये 4 शव पडून असल्याचा व्हिडीओ 6 मे रोजी प्रसिद्ध झाला होता. या शवांच्या आसपास इतर रुग्ण उपचार घेत होते तर त्यांचे नातेवाईक फिरतांना स्पष्ट दिसत होते. या प्रकारानंतर तत्कालीन अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी डॉ रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली.

 सायन रुग्णालयातील व्हिडीओ मधून जो प्रकार समोर आला त्यामुळे इतर रुग्णांच्या तसेच नातेवाईकांना नक्कीच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोगाने प्रमुख एम ए सईद यांनी सांगितले. त्या प्रकारानंतर झालेल्या सुनावणीत असे प्रकार पुन्हा घडु नयेत यासाठी काळजी घेणार असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयातील मृतदेहांबाबत नवी नियमावली बनवण्यात आली असून शव घरात जर जागा नसेल तर शव ठेवण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात शवांसाठी वेगळी जागा तयार केली असल्याचे ही आयोगापुढे सांगण्यात आले.

यानंतर आयोगाकडून इतर रुग्णालयांना देखील शवांसाठी अश्या प्रकारची वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते शव 30 मिनिटांच्या आत प्लास्टिक बॅग मध्ये भरून शवागृहात हलवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. 

मृत्यू झाल्यानंतर 1 तासाच्या आत मृतकांच्या नातेवाईकांना मृत्यूचा ना हरकत दाखला देण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. तर पुढील 3 तासांच्या आत शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना हे रुग्णालय प्रशासनाला आयोगाकडुन देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतरची सर्व जबाबदारी ही तेथील सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याला देण्यात आली आहे. रुग्णाच्या मृत्यू नंतर त्याचे शव वॉर्ड मधून शवागृहात नेणे त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देणे हे सर्व जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याचे सायन रुग्णालय प्रशासनाकडून आयोगाला सांगण्यात आले आहे.

संपादन: अथर्व महांकाळ 

patient felt mental stress because of that incident in sion hospital 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

SCROLL FOR NEXT