Maharashtra State Road Transport Corporation to run its premium Shivneri buses on Atal Setu Mumbai-Pune route check fare  
मुंबई

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

Person Jumped From Atal Setu: कार पार्क केल्यानंतर एका व्यक्तीने ट्रान्स-हार्बर अटल सेतूवरून उडी मारल्याची घटना घडली आहे. शिवडी येथे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.

Vrushal Karmarkar

अटल सेतूवर पुन्हा एकदा आत्महत्येची घटना समोर आली आहे. सोमवारी एका ४० वर्षीय व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणाने अटल सेतूवर आत्महत्या केल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सध्या समुद्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या वर्षातील अटल सेतूमधून आत्महत्येची ही चौथी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटल सेतू येथून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या व्यक्तीने आपली लाल ब्रेझा कार अटल सेतू येथे थांबवली आणि नंतर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अटल सेतूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही घटना सकाळी ९.५७ वाजता घडल्याचे दिसून आले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आत्महत्या केलेल्या व्यक्तीची लाल रंगाची कार तिथे उभी होती. ही कार सुशांत चक्रवर्तीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात असून पोलीस त्यांना घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या अटल सेतूवरून प्रवास करताना सागरी सेतूचे दृश्य प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. पण आता हाच अटल सेट एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे.

या वर्षातील अटल सेतू येथून आत्महत्येची ही चौथी घटना आहे. मार्चमध्ये 43 वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. बराच शोध घेऊनही महिलेचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर जुलै महिन्यात करुतुरी श्रीनिवासने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. नंतर ऑगस्टमध्ये, मुलुंडमधील एका 57 वर्षीय महिलेने कॅब ड्रायव्हरला कार थांबवण्यास सांगितले आणि अटल सेतूवरून उडी मारली, परंतु कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. आता पुन्हा 30 सप्टेंबर रोजी एका तरुणाने अटल पुलावरून उडी मारून आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT