High-Court-Mumbai
High-Court-Mumbai sakal media
मुंबई

मुंबई : सायकल ट्रॅक विरोधात न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक(Cycle Track) ला पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. तरी देखील हे काम स्थगित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे वनशक्ती संस्थेने थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका (Petition in Mumbai High Court)दाखल करून कामावर स्थगिती देण्याची विनंती केली आहे. सदरची जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असुन त्यांचेमार्फतच कामकाज सुरू आहे.

सदर जागेवर दगड व मातीची भरणी करून सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. सदरचा दगडी व खडीचा रस्ता हा मुख्यगेट पासुन अंदाजे 1 किलोमीटर पर्यंत कच्चा सायकल ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे.विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कोंकण पाणथळ निवारण समितीच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे मुंबई उपनगरातील 49 ठिकाणांची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार कुर्ला तालुक्यात एकूण 22 पाणथळ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून पवई तलाव येथील एकुण 4 ठिकाणे हे पाणथळ असल्याबाबत पाणथळ तक्रार निवारण समितीच्या अहवालात म्हटले आहे. पवई तलावाभोवती होणाऱ्या ट्रॅकमुळे मगरी आणि अन्य वन्यजीवांचे अस्तिव धोक्यात येत असल्याने पर्यावरण प्रेमी संघटना वनशक्ती संस्थेने या सायकल ट्रॅकला विरोध केला. मुंबई उच्च न्यायालयाने सायकल ट्रॅकच्या कामावर स्थगिती दिली आहे. असे असले तरी महानगरपालिकेने सायकल ट्रॅक रद्द केलेला नाही. याबाबत दोनच दिवसांपूर्वी हरित लवादाने ही हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.(Mumbai News)

पवई तलावात भारतीय मार्श मगरी आहेत.वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अनुसूची 1 नुसार या संरक्षित प्रजाती असून त्यांच्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव आणि वन विभागाची या उपक्रमासाठी परवानगी आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही परवानगी मिळालेली नाही तर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर्द्र भूमी तक्रार निवारण समितीने महाराष्ट्र आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना पत्र लिहून पवई तलावाजवळील सायकलिंग ट्रॅक प्रकल्पाबाबत तक्रार केली.

सायकल ट्रॅकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असणाऱ्या प्रजातींना सुद्धा यामुळे धोका आहे. सायकल ट्रॅक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

-डी.स्टॅलिन , प्रमुख , वनशक्ती संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT