petrol diesel rate sakal media
मुंबई

सलग चौथ्या दिवशीही मुंबईत इंधनाची दरवाढ; पेट्रोल 24 तर डिझेल 32 पैशांनी वाढले

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्यात पेट्रोलची दरवाढ (Petrol rate) नित्याने होत असताना आता पुन्हा चार दिवसापासून इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. आधीच कोरोना महामारीने (corona) सर्वसामान्य आर्थिक अडचणीत (financial crisis) असताना इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांपुढे संकट निर्माण झालं आहे मुंबईत रविवारी पेट्रोल 24 तर डिझेल 32 पैशाने वाढल्याने (petrol-diesel rate increases) कधी नव्हे एवढा इंधनाच्या दरात उच्चांक दिसून आला आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोल पाठोपाठ डिझेल ही शंभरीच्या मार्गावर शंभरी पार करण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.

गुरुवार पासून मुंबईत नियमित इंधन दरवाढ सुरू आहे. गेल्या चार दिवसात पेट्रोल 96 पैशाने वाढले आहे. 1.28 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईत पेट्रोल 108.43 तर डिझेल 98.48 रुपये प्रति लिटर दराची नोंद झाली आहे. तर राज्यभरात सध्या पेट्रोल चे दर 109 रुपये प्रति लिटर असून नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये 110 रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर पोहचले आहे. डिझेल दर सुमारे 98 रुपयांपेक्षा जास्त असून, सततच्या दरवाढीमुळे डिझेलही 100 रुपयांवर पोहचण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT