ऐरोली स्थानकासमोर खड्डेच खड्डे
ऐरोली स्थानकासमोर खड्डेच खड्डे 
मुंबई

ऐरोली स्थानकासमोर खड्डेच खड्डे

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील रिक्षा थांब्याच्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रिक्षाचालक आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने येणा-जाणाऱ्या नागरिकांना, दुचाकी वाहनचालकांना चिखल, खड्ड्यांतून वाट शोधावी लागत आहे. त्यातच या ठिकाणी रात्रीच्या वेळी असणारे पथदिवे बंद असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

ऐरोली रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील दिशेने प्रवेशद्वारातून बाहेर पडताना एक रिक्षा थांबा; तर स्थानकाच्या बाहेरदेखील एक रिक्षा थांबा आहे. ऐरोली गाव, सेक्‍टर-३, ४, २० समतानगर, माइंड स्पेस कंपनीकडे जाणारे नागरिक ऐरोली रेल्वे स्थानकातून रिक्षा पकडतात. त्या ठिकाणाहून मीटर व शेअरिंगच्या रिक्षादेखील आहेत. या रिक्षा थांब्यांमध्ये पावसाळ्यापासून खड्डेच खड्डे पडले आहेत. या ठिकाणी असणाऱ्या थांब्यांची दुरुस्ती करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. हे काम मागील काही महिन्यांपासून रखडल्याने मातीचा खच, पेव्हर ब्लॉक रस्त्यावर पडूनच आहेत. रिक्षा थांब्यांच्या परिसरात खड्डे पडले असून, त्यात पाणी साचून त्या खड्ड्यांतून वाहने गेल्यास येणा-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखल उडत आहे. 

स्थानक परिसर असल्याने त्या ठिकाणी खासगी वाहनांचीदेखील वर्दळ असते. या वाहनचालकांनादेखील या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालक, स्थानक परिसरात पार्किंगकरिता येणाऱ्या खासगी वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रेल्वे स्थानकातील खड्ड्यांमुळे वाहतूक तासन्‌ तास खोळंबत आहे; तर किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत आहेत. संबंधित रस्त्यांच्या ठेकेदारांनी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले; मात्र त्यानंतर यातील माती, दगड वाहून गेल्याने पुन्हा खड्डे उफाळून आले आहेत, असे रिक्षाचालकांनी बोलताना सांगितले.

ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात मोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साठून दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना कुठून चालावे हा प्रश्‍न पडतो. त्यामुळे या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी.
- प्राजक्ता काळे, स्थानिक नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT