मुंबई

PM Modi In Thane: पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, 12 तास रहदारी राहणार बंद

Latest Thane News: २४ तासांकरिता वाहतूक बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Latest Thane News: कासारवडवली येथे महिला सशक्तीकरण अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. ५) ठाणे शहरात येत आहेत. या कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील जड-अवजड वाहनांची वाहतूक मध्यरात्री एकपासून दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर वाहतूक विभागातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जातो. या महामार्गावरून परराज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू असते.

गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रातून नवी मुंबई जेएनपीटीकडून मुंब्रा बायपास, घोडबंदर रोडमार्गे गुजरात, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी २४ तासांकरिता वाहतूक बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

पर्यायी मार्ग :

- गुजरातकडून नवी मुंबईकडे येणारी वाहने मनोर टोल नाका येथून विक्रमगड, पाली, वाडा, आबिटघर-आटगाव, शहापूर, मुरबाड, कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे जातील.

- नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने शहापूर- मुरबाड- कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे जातील.

- मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली टोल नाकामार्गे कर्जत- मुरबाड- शहापूर- वाडा- मनोर टोल नाकामार्गे मार्गस्थ होतील.

- नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी जड- अवजड वाहने कर्जत- मुरबाड- शहापूरमार्गे नाशिककडे तसेच आटगाव- आविरघर- वाडा- पाली- विक्रमगड- मनोर टोल नाकामार्गे गुजरातकडे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT