नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत सहभागी झालेले हजारो कार्यकर्ते.
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत सहभागी झालेले हजारो कार्यकर्ते.  
मुंबई

खारघर नगरी मोदीमय!

सकाळ वृत्तसेवा

खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे भाषण ऐकण्याची संधी हुकल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.

खारघरमधील सेंट्रल पार्कशेजारील सेक्‍टर २९ मधील मैदानात मोदी यांची जाहीर सभा असल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून पोलिसांची दिलेल्या ठिकाणावर पोहचण्यास सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांना दुपारी ४ ची वेळ देण्यात आल्यामुळे दुपारी १ वाजल्यापासून पनवेल शहर आणि ग्रामीण व नवी मुंबई परिसरातील कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली होती. दुपारी २ नंतर कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ओघ वाढल्याने खारघरच्या प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने १५ ते २० वाहतूक पोलिसांची नेमणूक केली होती.

या वेळी खारघरमधील अंगण सोसायटीमधील ३० सोसायटीच्या सदस्यांनी डोक्‍यावर फेटा, शर्टावर मोदी, कमळाचा स्टीकर लावल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यकर्त्यांना घेऊन आलेल्या वाहनांमुळे ग्रामविकास भवन ते मुर्बी गाव आणि रांजणपाडा, ओवे पेठ गावाच्या रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तसेच नवी मुंबई पालिकेच्या एनएमएमटी बस खारघर सेंट्रल पार्कमार्गे तळोजा वसाहतीपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या. सेंट्रल पार्कमार्गे बस बंद असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी परिवहन विभागाचे सहायक नियंत्रक अनिल सोनी हे सकाळी ११ वाजल्यापासून चालकांना मार्गदर्शन करत होते.

पोलिसांनी काळे कपडे घालून सभास्थळी येऊ नये, असे निर्देश अगोदर दिले असल्याने कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करणे टाळले होते. मात्र, अचानक पिवळे कपडे घातलेल्यांना प्रवेश देण्यासही बंदी घातली असल्याच्या सूचना आल्याने पिवळ्या रंगाचे कपडे घातलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. सभास्थानी शरीरावर भाजपचे झेंडे, मोदींचा चेहरा रंगवून आलेले प्रकाश गायकवाड, विजय रॉय हे दोन युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दोघांसोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. 

पंतप्रधानांच्या सभेत काळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश नसल्याचे सभास्थानी समजले. त्यामुळे सोबत आलेल्या महिलांना सभा समाप्त होईपर्यंत बाहेरच थांबावे लागले.
- सुलभा यादव, शिवसेना कार्यकर्त्या, कामोठे वसाहत.

मोदी देशाचे पंतप्रधान असले, तरी आमदार प्रशांत ठाकूर हे आमच्यासाठी सर्व काही आहेत. आमच्या गाववाड्यांच्या विकासासाठी आम्ही त्यांच्याकडे जातो. आमदार ठाकूर हे मोठ्या मताधिक्‍याने निवडून यावेत, यासाठी सभेला आलो.
- सविता भगत, नेरापाडा, पनवेल

प्रशांत ठाकूर यांच्या सभेमुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण समोरासमोर बसून ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही गावातील जवळपास पन्नासहून अधिकजण सभेसाठी आलो आहोत. या सभेमुळे ठाकूर हे नक्कीच निवडून येणार यात शंका नाही.
- संतोष शेळके, वांगणी, पनवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT