police fir sakal media
मुंबई

पनवेल : २३ लाख ७९ हजाराची वीज चोरी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : तळोजा नावडे येथील वळवली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने महावितरणची तब्बल २३ लाख ८० हजार रुपयांची वीजचोरी (Electricity robbery) केल्याचे उघडकीस आले आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करून तसेच चेंजओव्हर स्विचच्या माध्यमातून घराजवळ असलेल्या पोलवरून वीज घेऊन त्याने वीज चोरी केली. शेवन परशुराम पाटील, असे या व्यक्तीचे नाव असून महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्याविरोधात (Panvel police station) पनवेल शहर पोलिस ठाण्यात (FIR Filed) गुन्हा दाखल केला आहे.

विजेची चोरी होत असल्याची माहिती महावितरणचे वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे यांना मिळाली होती. त्यामुळे पानतावणे यांनी भरारी पथकाचे सहायक अभियंता कपिल गाठले यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ८ मार्च रोजी दुपारी भरारी पथकाने पाटील यांच्या घरावर छापा मारून वीज मीटरची तपासणी केली असता वीज मीटरचे सील तोडण्यात आल्याचे आढळून आले.

पाटील यांच्या विद्युत बिलावरील वीज वापर व घरामध्ये जोडलेला विद्युतभार यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आढळून आल्याने भरारी पथकाने घराच्या वीज जोडणीची व्यवस्थित तपासणी केली. भरारी पथकाने केलेल्या तपासणीत पाटील यांनी २०१५ पासून ही वीज चोरी सुरू केल्याचे व गत ८२ महिन्यांमध्ये तब्बल २३ लाख ७९ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने शेवन पाटील यांच्याविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT