मुंबई

 गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे गुडवीन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या बंधूंना शनिवारी ठाणे विशेष न्यायालयातील एमपीआयडी न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.ठाणे पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींचा ताबा फसवणूक केलेल्या अन्य ठिकाणच्या पोलिसांकडे दिला जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फसव्या योजनांचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणारे अकराकरण बंधू शुक्रवारी ठाणे विशेष न्यायालयाच्या एमपीआयडी न्यायालयात शरण आल्यानंतर दोघांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांना नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुडवीन ज्वेलर्स या प्रकरणातील गुन्ह्यात शनिवारी एमपीआयडी न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्यासमोर हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकील मुंढे यांनी काम पाहिले.

या प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींना जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायाधीश जाधव यांनी त्या दोघांनाही २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी चार जण सहआरोपी असल्याने त्या चौघांना लवकरच अटक केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT