मुंबई

'त्या' पोलिस निरीक्षकानं परमबीर सिंग यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचं पत्र व्हायरल

अनिश पाटील

मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना आता परमबीर सिंग यांच्याविरोधात पोलिस निरीक्षकाने केलेल्या तक्रारीचे पत्र समोर आले आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी व्हॉट्स अॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 

पोलिस निरीक्षक अनुप संभाजी डांगे यांची त्यावेळी गावदेवी पोलिस ठाण्यातून दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात त्यांची बदली करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि निर्माता भरत शहाचा नातू यश याने पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण केली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली आणि यश आणि त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी यश आणि एका मैत्रीणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणाशी संबंध नसलेल्या जितू नवलानी नाव आरोपी म्हणून घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीचा याप्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी डांगे यांनी त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंग यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता, असा आरोप पत्रात केला होता. 

या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. त्यावेळी  डांगे यांनी गावदेवी अधिका-यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर डांगे यानी टाकलेल्या एका संदेशाची गंभीर दखल घेत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Police Inspector Anup Dange had lodged complaint against Param bir Singh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT