मुंबई

मिरा-भाईंदरमधील बारवर पोलिसांची नजर

CD

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातानंतर ठिकठिकाणच्या पब आणि बारची झाडाझडती पोलिसांकडून सुरू झाली आहे. त्याला मिरा-भाईंदरही अपवाद नाही. शहरातील सर्व बारची तपासणी सध्या पोलिसांकडून केली जात असून बारमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिले जात नाही ना, यावर नजर ठेवतानाच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांनी बार, पबचालकांना दिल्या आहेत.

मिरा-भाईंदर शहरात बार व ऑर्केस्ट्रा बारची संख्या फार मोठी आहे. विशेष करून दहिसर चेकनाक्याजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बारची संख्या सर्वाधिक आहे. लगतच्या शहरातील, तसेच अन्य राज्यातील ग्राहकही या बारमध्ये नियमितपणे येत असतात. अनेकदा हे बार नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असल्याची तक्रारी केल्या जातात. पुण्यात झालेल्या अपघातानंतर मिरा-भाईंदर पोलिसही सतर्क झाले आहेत. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना बारची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडूनही बारची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. बारचे परवाने तपासणे, बारना दिलेल्या नोकरनाम्यानुसार बारमध्ये बारबाला नियुक्त करण्यात आल्या आहेत का, याची खातरजमा करणे, मद्यविक्री करताना दुकानांना ग्राहकना १८ वर्षांवरील आहेत ना, याची खातरजमा करण्याच्या सूचना देणे आदी कार्यवाही या विभागाने सुरू केली आहे. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ व्यवसाय करणाऱ्या एका देशी दारू बारवर या विभागाकडून कारवाईदेखील करण्यात आली आहे.

बार नियोजित वेळेनुसार रात्री दीड वाजता बंद होतात की नाही, बारला योग्य परवाना आहे की नाही, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्यपुरवठा केला जात आहे का, यावरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. याव्यतिरिक्त मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या वेळी नाकाबंदी, पोलिसांची गस्त आदी उपाययोजना केल्या जात आहेत.
- प्रकाश गायकवाड, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी 'त्या' गोलंदाजाचे पुनरागमन! मँचेस्टर कसोटीसाठी दोन दिवस आधीच प्लेइंग-११ जाहीर

Nalasopara Murder: खळबळजनक! नालासोपारात 'दृश्यम' सारखी घटना; पतीचा मृतदेह घरातच पुरला अन् वरून फरशीही बसवली, मात्र...

Jagdeep Dhankhar Resigns: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रकरणात ईडीला फटकारले; ''तुमचा वापर कशासाठी केला जातोय?''

Ration Card: आता 'या' नागरिकांचे रेशन होणार कायमचे बंद, पहा यादीत तुमचं तर नाव नाही ना? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT