मुंबई

कल्याण ऑनर किलिंग प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल

सकाळ वृत्तसेवा


कल्याण : आतरधर्मीय मुलाशी प्रेमसंबध असल्याच्या रागातून पित्यानेच आपल्या मुलीची निर्घृन हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक कीली. चौकशीत आरोेपी पित्याने गुन्ह्याची कबूली  दिली असली, तरी आरोपीकडून हत्या कशी  आणि कोणत्या शस्त्राने केली याबाबत मात्र दिशाभुल केली जात आहे.

आंतरधर्मीय विवाह केल्यास समाजात बदनामी होईल, तसेच अन्य तीन बहिणींशी लग्न कोण करणार, असा सवाल आरोपी पिता अरविंद याने मृत प्रिन्सीला केला; मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे ३० नोव्हेंबरपासून तिला कामावर पाठवणेही बंद केले. त्यावर मुलीने पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्याची धमकी दिली, तसेच तिने गावाला येण्यासही नकार दिल्यामुळे प्रिन्सीची हत्या केल्याची कबुली आरोपी पित्याने पोलिसांना दिली. दरम्यान आरोपी अरविंद तिवारी (४७) याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता आरोपी पित्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रिन्सी तिवारी हिचे १२ वी पर्यंत शिक्षण  झाले होते. ती भांडुप येथील खासगी कंपनीत कामाला जात होती; तर अरविंद तिवारी हा मालाड येथील खासगी कंपनीत कामाला होता. मुलीचे आंतरधर्मीय मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यामुळे नेहमी बाप-लेकींमध्ये भांडण होत असे. ही भांडणे गुरुवारी (ता. ५) शिगेला पोचली होती.

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अरविंद याने आपल्या मुलीची हत्या केली. आरोपीने शुक्रवारी दुपारी कल्याणमध्ये येऊन धारदार शस्र खरेदी करत मुलीच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. शनिवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता मुलीचे डोके आणि कंबरेवरील भाग एका गोणीत भरून कल्याणच्या खाडीत टाकला आणि रविवारी (ता. ८) उरलेला मृतदेह टाकण्याच्या आधी हा प्रकार उघकीस आला.े आरोपी यातून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे दिसत असून महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस कसून तपास 
करत आहेत.

मृतदेहाचा दुसरा तुकडा सापडला; डोक्‍याचा शोध सुरू
बुधवारी (ता. ८) सकाळी ९.३० वाजल्यापासून कल्याण खाडीमध्ये चार पोलिस अधिकारी, २५ कर्मचारी, कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी, अग्निशमन दल, कोळी बांधव यांच्या मदतीने मृतदेह शोधमोहीम सुरू झाली. त्यानंतर साडेचार तासांनी सुमारे १२.३० च्या सुमारास गणेश घाटापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर डोके नसलेला मृतदेह सापडला आहे. डीएनए आणि शवविच्छेदनासाठी हा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली; तर मृतदेहाच्या डोक्‍याचा शोध उद्याही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 

प्रियकर व नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावणार
दरम्यान, पोलिस तपासासाठी प्रिन्सीचे ज्याच्याशी प्रेमसंबंध होते, त्या युवकाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तसेच आरोपी अरविंद तिवारी याच्या पत्नीला घटनेबाबत कळवले असून तिलाही गावावरून बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT