police news to become police dream 22-year-old dies during training mumbai
police news to become police dream 22-year-old dies during training mumbai sakal
मुंबई

पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे! सरावादरम्यान २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

विजय गायकवाड

नालासोपारा : गेल्या 5 ते 10 वर्षांनंतर पहिल्यांदा राज्यात सर्वात मोठी पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे. याच भरतीची तयारी करणा-या 22 वर्षीय तरुणाचा वसईत दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना सोमवार घडली. या घटनेने वसई आणि विरारमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा अर्नाळा किल्ल्यातील पण सध्या वसई पश्चिमेला असलेल्या रानगाव येथे राहत होता. राज्यात सर्वात मोठी पोलीस शिपाई पदाची पोलीस भरती होणार असून या भरतीची 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख आहे.

या सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेत आपण भरती व्हावे यासाठी राज्यातील लाखो तरुण भरतीपूर्व सराव करत आहेत. असाच सराव वसईच्या रानगाव परिसरात राहणारा प्रतीक हा करत होता. सोमवारी संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान धावत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले आणि काही वेळात त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस दलात भरती होण्यापूर्वीच वसईतील 22 वर्षीय तरुणाचे स्वप्न भंगल्याने वसई, विरार, नालासोपारा परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण या तरुणांच्या मृत्यूची सरकार दाखल घेऊन त्याच्या कुटुंबियांना मदत करेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सरावादरम्यान काय काळजी घ्यावी?

सराव करणाऱ्या राज्यातील तरुणांनी जिथं शक्य असेल तिथे राज्यस्तरीय तसेच ॲथलेटीक्सशी संबंधित असलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. धावत असताना किंवा वॉर्म अपदरम्यान थांबावे आणि बसूनच पाणी प्यावे. छातीत कळ आल्यावर थोडी विश्रांती करावी, असे आवाहन मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल निनाद पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT