Loan Apps Fraud
Loan Apps Fraud Sakal
मुंबई

फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांचा प्रस्ताव; १०० अॅप्सच्या ब्लॉकिंगची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई पोलिसांनी पर्सनल लोन देणाऱ्या १०० अॅप्सची एक यादी तयार केली असून या अॅप्सला ब्लॉक करण्याची मागणी केली आहे. कर्ज घेणाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या प्रकारात २३ एफआय़आर नोंदवण्यात आले होते, मात्र आता हा आकडा २७ वर पोहोचला आहे. (Police Proposed to block 100 apps regarding personal loan)

मालाडच्या एका व्यक्तीने अशा प्रकारे पर्सनल लोन देणाऱ्या कंपनीच्या एजंटच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलिसांनी अशा पर्सनल लोन देणाऱ्या अॅप्सची यादी CERT-In या राष्ट्रीय यंत्रणेला दिली आहे आणि हे अॅप्स ब्लॉक करण्याची मागणी केली आहे. आम्ही या यंत्रणेकडे प्रस्ताव ठेवला आहे. आता हे अॅप्स ब्लॉक करण्याविषयीचा निर्णय तेच घेतील.

ब्लॉक केल्यानंतरही हे अॅप्स नव्या रुपात येऊ शकतात आणि आपलं काम सुरुच ठेवू शकतात. त्यामुळे फसवणूक टाळायची असेल तर नागरिकांनीच सावध राहिलं पाहिजे. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, असुरक्षित अॅप्स डाऊनलोड करू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच याविषयी जनजागृती आणि लोकांना शिक्षित करण्याचे प्रयत्नही करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

असे अॅप्स इन्स्टॉलेशनच्या वेळी युजरकडून सगळ्या परमिशन मागतात, ज्या युजर देऊनही टाकतो. त्यामुळे अॅप्सला फोनमधले फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट सर्वकाही उपलब्ध होतं. जेव्हा पैसे द्यायची वेळ येते, तेव्हा खरा त्रास सुरू होतो. आरोपीच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ पाठवणं, ते डिलीट करण्याच्या बदल्यात पैसे मागणं हा खेळ सुरू होता. कोरोनाकाळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली, त्यामुळे अनेकांना कर्जाची गरज आहे, असे लोक या फसवणूक करणाऱ्यांना बळी पडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT