मुंबई

वाशीतील हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा; 200 हून अधिक मद्यधुंद तरुण-तरुणींची धरपकड

विक्रम गायकवाड


नवी मुंबई : एपीएसमीतील सत्रा फ्लाझा या इमारतीतील कॅफे पाम ऍटलांटिस या बारमध्ये बेकायदेशीरीत्या आयोजित करण्यात आलेल्या हुक्का व दारुच्या पार्टीवर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारुन तब्बल 203 तरुण तरुणींची धरपकड केली. सदर या कारवाईत पोलिसांनी कॅफे पाम ऍटलांटीस या बारच्या मालकावर तसेच हुक्का पार्टीचे आयोजन करणाऱ्या एकुण 27 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ तसेच मोठ्या प्रमाणात मद्य जप्त केले आहे.

विशेष म्हणजे कॅफे पाम ऍटलांटीस या बारमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालविल्याप्रकरणी पोलिसांनी यापुर्वी दोनवेळा कारवाई केलेली आहे. मात्र त्यानंतर देखील या बारमध्ये हुक्का पार्लर राजरोसपणे चालविण्यात येत असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे.  

लॉकडाऊनमुळे गेल्या सहा सात महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स-बार आणि पब्स अटी शर्तीवर सुरु करण्याची राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर एपीएमसीतील सत्रा फ्लाझा या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेले कॅफे पाम ऍटलांटिस हे बार देखील काही दिवसापुर्वी सुरु झाले. मात्र त्यानंतर या बारचा मालक निकुंज सावला याने काही दिवसातच या बारमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरु केले. 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेसह बार सुरु करण्याची राज्य शासनाने परवानगी दिलेली असताना देखील या बारच्या चालक-मालकांनी राज्य शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून शनिवारी या बारमध्ये हुक्का पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी शेकडो तरुण तरुणींना आंमत्रण देण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी या बारमध्ये पार्टीसाठी आलेल्या तरुणांची एकच गर्दी झाली होती.  

याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत व त्यांच्या पथकाने एपीएमसी पोलिसांच्या मदतीने या बारवर शनिवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी कॅफे पाम अटलांटिस बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरु असल्याचे तसेच सदर पार्टीमध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत झिंगताना आढळुन आले. यावेळी पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ तसेच मोठया प्रमाणात मद्य जप्त केले आहे. त्यानंतर पोलिसांनी 203 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अदखलपात्र गुह्यांची नोंद करुन त्याना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी हुक्का पार्टीचे आयोजन करणाऱया कॅफे पाम ऍटलाटीसच्या चालक मालकासह सदर बारमधील वेटर, कॅशीयर व इतर अशा 27 जणांवर अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालवणे, गर्दी जमवणे, कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणे यासह इतर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Police raid hookah party in Vashi Arrest of more than 200 youths

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT