मुंबई

1 लाखाची बांगडी पोलिसांनी शोधली!

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : हिरानंदानी इस्टेट मध्ये राहणारी एक महिला गुरूवारी (ता.9) रोजी सकाळी रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी हरवल्याची घटना घडली होती. एक लाख रुपये किमतीची ही बांगडी सर्वत्र शोधूनही सापडली नाही. अखेर महिलेने कासारवडवली पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून या महिलेस तिचा सोन्याचा ऐवज परत मिळवून दिला. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी हा ऐवज सदर महिलेस परत केला. 


घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथे राहणाऱ्या आकांक्षा श्रीवास्तव या ता.9 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भूमी एकर्स परिसरातून रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी त्यांच्या हातातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची बांगडी रस्त्यात गहाळ झाली. सर्वत्र शोध घेऊन देखील ही बांगडी त्यांना मिळून आली नाही. अखेर आकांक्षा यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास हाती घेतला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार आर. एस. चौधरी व पोलीस नाईक आर. एस. महापुरे यांना घटनास्थळी पाठवून तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक महिला सोन्याचा ऐवज उचलून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिलेचा शोध घेऊन सोन्याची बांगडी परत मिळवली. ही बांगडी आकांक्षा यांना परत करण्यात आली. आपला सोन्याचा ऐवज परत मिळाल्यानंतर महिलेने पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT